Gajanan samadhan bhagat
4 years 7 months ago
माननीय महोदय,
शेतकऱ्याला आपला शेतातील माल घरापासून 20 ते 30 किमी अंतरावर 1000 ते 2000 रुपये खर्च करून अडत मध्ये विकण्यासाठी न्यावा लागतो व व्यापारी मागेल त्या भावानेच द्यावा लागतो, कारण शेतकऱ्याने आपला माल जर न परवडणाऱ्या भावाला नाही दिला तर मग त्याला आपला माल परत घरी आणायचा असल्यास परत 1000 ते 2000 रुपये खर्च करावा लागतो.
तर माननीय महोदय माझी आपणास अशी विनंती आहे तालुक्याच्या ठिकाणची अडत व्यवस्था प्रत्येक गावात तयार करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना परवडेल त्याच भावाने माल विकला जाईल.
Like
(6)
Dislike
(1)
Reply
Report Spam